मुंबई: राज्य सरकारच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून 5 लाख महिलांना वगळण्यात आले असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, या अपात्र महिलांमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या 2.30 लाख लाभार्थी महिलांचा समावेश आहे.

सरकारने केली काटेकोट तपासणी

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेली “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी मोठा आधार बनली होती. मात्र, सरकारने अलीकडे या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी सुरू केली. त्यात अनेक महिलांनी खोटी माहिती देऊन योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले. तसेच, इतर सरकारी योजनांतील लाभार्थ्यांनीही या योजनेसाठी अर्ज केल्याचे निदर्शनास आले आहे.

कोणत्या महिलांना वगळले?

मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटद्वारे माहिती दिली की, 28 जून 2024 आणि 3 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार काही महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामध्ये –

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी – 2.30 लाख महिलांना वगळले

65 वर्षांवरील – 1.10 लाख महिलांना वगळले

कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी गाडी असल्यास

नमोशक्ती योजनेच्या लाभार्थींना वगळले

स्वेच्छेने योजनेतून बाहेर पडलेल्या 1.60 लाख महिलांची नावे हटवली

महिला वर्गात फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत उत्सुकता

दरमहा 1500 रुपये मिळणाऱ्या या योजनेचा फेब्रुवारी हप्ता केव्हा मिळणार, यावरही चर्चा सुरू आहे. जानेवारीचा हप्ता महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मिळाला होता. त्यामुळे याहीवेळी हप्ता त्याच कालावधीत मिळण्याची शक्यता आहे.

याशिवाय, निवडणुकीच्या प्रचारात महायुती सरकारने हे अनुदान 1500 वरून 2100 रुपये करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात या संदर्भात कोणती तरतूद होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा

राहुल गांधींनी निकलाधीच पराभव स्वीकारला- देवेंद्र फडणवीस

Spread the love