परभणी: येथे आयोजित मूक मोर्चात भाजप आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर “क्या हुआ तेरा वादा अजितदादा” असे म्हणत सडकून टीका केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एक्स वरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी यावर तातडीने प्रतिक्रिया दिली.

मिटकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून टीकास्त्र सोडले. त्यांनी लिहिले,

श्री @Dev_Fadnavis जी, आपल्या पक्षाचे आमदार श्री सुरेश धस यांनी काल परभणीतील मूक मोर्चातक्या हुआ तेरा वादा अजितदादाअशा प्रकारे वक्तव्य करून आदरणीय अजितदादांविषयी जी गरळ ओकली, त्याबद्दल आपण त्यांना जाब विचारणार की त्यांचा बेभान सुटलेला बैल आणखी मोकाट सोडणार?”

मिटकरी यांच्या या ट्विटमुळे वातावरण अधिकच तापले असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे.

सुरेश धस यांचे विधान आणि त्याचा राजकीय परिणाम

परभणीतील मूक मोर्चाच्या निमित्ताने सुरेश धस यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदावर असून विरोधी पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर वारंवार प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, मूक मोर्चात असे विधान करणे राजकीय सभ्यतेच्या मर्यादांचे उल्लंघन असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मत व्यक्त करत आहेत.

भाजपची भूमिका काय?

मिटकरी यांच्या ट्विटनंतर भाजपकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. मात्र, या प्रकरणावर भाजपने सुरेश धस यांचे समर्थन केले तर वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

राजकीय तापमान वाढण्याची शक्यता

सध्या राज्यातील राजकारणात या प्रकारामुळे उहापोह सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे आहेत.

Spread the love