छत्रपती संभाजीनगर: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्री शिव आराधना भक्त परिवाराच्या वतीने श्री हरिहरेश्वर महादेव मंदिर, गजानन नगरी (विटखेडा परिसर) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, त्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
या शिबिरात वैशाली उंडे, उषा पाटील, सारिका गिरी, सुमन वावधने, वैष्णवी पाटील, अमृता ताई, अनिता महाजन, आणि जाधव ताई आदींनी रक्तदान केले. महिलांचा बढता सहभाग समाजातील सकारात्मक बदलाचे प्रतीक ठरत असून, रक्तदानाच्या माध्यमातून त्यांनी आरोग्यदायी समाजाच्या उभारणीस हातभार लावला.
या उपक्रमाला डॉ. अर्चना गादिया मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले. श्री हरिहरेश्वर मंदिराच्या पवित्र वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला भक्त परिवारातील सदस्य, रक्तदाते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला दिनानिमित्त आयोजित या रक्तदान शिबिराने समाजात आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यास मदत केली. महिलांनी पुढाकार घेत रक्तदान करून समाजातील रूढ कल्पनांना छेद दिला आणि इतरांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले.
या रक्तदान शिबिरात अमृता ब्लड सेंटर तर्फे रक्त संकलन करण्यात आले. हे रक्त गरजू रुग्णांना उपलब्ध करून देण्यासाठी पुढील वैद्यकीय प्रक्रियेनुसार वापरण्यात येणार आहे. अमृता ब्लड सेंटरच्या अधिकाऱ्यांनी रक्तदात्यांचे आभार मानले आणि नियमित रक्तदान करण्याचे आवाहन केले.