रिजर्व बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी रेपो दर 0.25% (25 बेसिस पॉइंट्स) ने कमी करून तो 6.25% केला. या निर्णयामुळे कर्जावरील व्याजदर कमी होणार असून गृहकर्जाच्या EMI मध्ये कपात होणार आहे.

रेपो दर कपातीचा अर्थ आणि कारणे:
1. गृहकर्जावर थेट परिणाम – ऑक्टोबर 2019 नंतर घेतलेली सर्व फ्लोटिंग-रेट कर्जे बाह्य बेंचमार्क (जसे की रेपो दर) ला जोडलेली आहेत. त्यामुळे रेपो दर कपतीचा थेट फायदा गृहकर्जदारांना मिळणार आहे.
2. महागाई नियंत्रणात – डिसेंबर महिन्यात महागाईचा दर 5.22% पर्यंत घसरला, जो मागील चार महिन्यांतील सर्वात कमी होता. अन्नधान्याच्या किंमतीतही स्थिरता दिसून आली आहे.
3. अर्थव्यवस्थेला चालना – सरकार आणि RBI यांचे धोरण आर्थिक वाढीला गती देण्यासाठी अनुकूल आहे.

तुमच्या गृहकर्जावर किती बचत होईल?

समजा, कर्जाचा कालावधी 20 वर्षे (240 महिने) आहे आणि व्याजदर 9% वरून 8.75% झाला आहे.

कर्ज रक्कम,EMI (मासिक हफ्ता),मूळ व्याज भरपाई,नवीन व्याज भरपाई,एकूण बचत,कालावधी कमी होणार
₹50 लाख,₹44,986,₹57.96 लाख,₹53.6 लाख,₹4.36 लाख,10 महिने
₹75 लाख,₹67,480,₹86.95 लाख,₹80.4 लाख,₹6.55 लाख,10 महिने
₹1 कोटी,₹89,973,₹1.15 कोटी,₹1.07 कोटी,₹8.73 लाख,10 महिने

गृहकर्जदारांनी काय करावे?

बँकेशी संपर्क साधा: नवीन व्याजदर लागू होण्यासाठी तुमच्या बँकेकडून माहिती घ्या.
EMI कायम ठेवून कर्जाचा कालावधी कमी करा: यामुळे व्याजाचा भार आणखी कमी होईल.
टॉप-अप कर्जाचा विचार करा: कमी व्याजदरामुळे जर अतिरिक्त आर्थिक गरज असेल तर टॉप-अप लोन स्वस्त होऊ शकते.
कर्ज पुनर्गठन (Refinancing) करा: जर तुमची सध्याची बँक व्याजदर कपात पास करत नसेल, तर दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करण्याचा विचार करा.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *