बीड: संध्या सोनवणे या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. आणि त्यांनी राजकारणात महत्त्वपूर्ण स्थान मिळवले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली युवती काँग्रेसने अनेक उपक्रम राबवले आहेत. याशिवाय त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी तसेच युवा सशक्तिकरणासाठी अनेक प्रयत्न केले आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या आणि राजकीय कारकीर्द
संध्या सोनवणे यांचा जन्म जामखेड तालुक्यातील नायगाव गावात एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण आणि सामाजिक कार्य त्यांना राजकारणात यायला प्रेरणा देणारे ठरले. २०१८ मध्ये त्यांनी फर्ग्युसन कॉलेजच्या जनरल सेक्रेटरी म्हणून काम केले, जिथे विद्यार्थ्यांच्या प्रशांसाठी त्यांनी अनेक यशस्वी आंदोलने केली. विशेषतः, त्या शरदचंद्र पवार गटाशी संबंधित होत्या, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार गटात प्रवेश करून त्यांनी आपले कार्य चालू ठेवले.
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड
संध्या सोनवणे यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर अजित पवार गटाने राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडले. या पदावर निवड झाल्यानंतर संध्या सोनवणे यांनी युवतींना राजकारणात सक्रिय करण्याचे वचन दिले आणि त्यांच्या नेतृत्वाने एक नवा आदर्श निर्माण केला
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता सीआयडीच्या चौकशीला वेग आला असून तपास जलदगतीने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विविध व्यक्तींची चौकशी केली जात असून, त्यात पक्षाच्या काही नेत्यांनाही चौकशीला सामोरे जावे लागत आहे. म्हणून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनावणे यांनाही चौकशीसाठी सीआयडीकडून समन्स पाठवण्यात आले होते. या घटनेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
सीआयडीने तब्बल सात तास त्यांची चौकशी केली आणि शेवटी त्यांना परत जाण्याची परवानगी देण्यात आली. चौकशी संपल्यानंतर बोलताना सोनावणे यांनी त्यांना का बोलावण्यात आले होते आणि काय विचारणा झाली, याबाबत खुलासा केला.
हे ही वाचा
वाल्मिक कराडचे परदेशात पलायन करण्याचे मार्ग बंद, मोठी माहिती समोर
[…] मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील […]
[…] जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी […]