अंबड : तालुक्यातील शहागड येथील बस स्थानकात स्वच्छतागृहाची व्यवस्था नव्हती. स्वच्छतागृहाअभावी महिला प्रवाशासंह स्थानिक नागरिकांची कुचुंबना होत होती. हा प्रश्न सोडविण्याचा शब्द समृद्धी शुगर्सचे चेअरमन सतीश घाटगे यांनी दिला होता. त्यानुसार या ठिकाणी १० लक्ष रुपयांचा निधी मिळवून देत सुसज्ज अशा स्वच्छतागृहाची निर्मिती त्यांनी केली. प्रवाशांसह येथील व्यापाऱ्यांचा महत्वाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल शहागडच्या जनतेने सतीश घाटगे यांचे आभार मानले.

गेल्या अनेक वर्षापासून शहागड बस स्थानकातील स्वच्छतागृहाचा प्रश्न चर्चेत होता. परंतु कुणीही हा प्रश्न मार्गी लावू शकले नव्हते. सहा महिन्यापूर्वी शहागड येथील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी सतीश घाटगे पाटील यांच्याकडे हा प्रश्न मांडला होता. त्यांनी हा प्रश्न संवेदनशील पणे समजून घेऊन शहागड बस स्थानक परिसरात सुसज्ज स्वच्छतागृह उभारण्यासाठी 10 लाखाचा निधी शासनाकडून मंजूर करून आणला. या निधीतून बस स्थानक परिसरात सुसज्ज असे स्वच्छतागृह तयार झाले. 2 फेब्रुवारी रोजी सतीश घाटगे यांच्या हस्ते या स्वच्छतागृहाची लोकार्पण झाल्यानंतर नागरिकांसाठी हे स्वच्छतागृह खुले करण्यात आले.

सत्ता असो वा नसो जनतेचे प्रश्न सोडवता येते- सतीश घाटगे
जनतेचे प्रश्न खूप मोठे नाहीत, फक्त ते सोडविण्यासाठी इच्छाशक्तीची गरज असते. निवडणुकीत पराभव झाला असला तरी माझे राजकारण विकासावर होते आणि यापुढेही राहील. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता असो किंवा नसो प्रश्न सोडवता येतात. माता – भगिनींची स्वच्छतागृहाअभावी होणारी कुचंबना थांबवता आली याचे समाधान आहे. हे काम करून मी शहागडच्या जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला आहे.