टीम गावगाडा डॉट कॉम; पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर घडलेल्या धक्कादायक घटनेने शहरात आणि राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. मंगळवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास 26 वर्षीय तरुणीवर एसटी बसमध्ये बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, वैद्यकीय अहवालात तिच्यावर दोन वेळा अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. नराधम फक्त एकदाच बलात्कार करून थांबला नाही असे निष्पन्न झाले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

फलटणला जाण्यासाठी पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात आलेल्या पीडित तरुणीला दत्तात्रय गाडे या सराईत गुन्हेगाराने निर्जन स्थळी उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये जबरदस्तीने नेऊन अत्याचार केला. बुधवारी दुपारी ही घटना समोर आली, त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

या घटनेनंतर पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी ससून रुग्णालयात केली असता, तिला दोन वेळा बलात्काराला सामोरे जावे लागल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, ही घटना घडली त्यावेळी बसस्थानकावर 18 सीसीटीव्ही कॅमेरे, पोलिस चौकी आणि सुरक्षारक्षक होते, मात्र तरीही आरोपीने असा घृणास्पद प्रकार केला.

आरोपी कोण आहे?

नराधम दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून, यापूर्वी त्याच्यावर शिरूर आणि शिक्रापूर येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तो काही दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आला होता. सध्या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी आठ विशेष पथके तैनात केली असून लवकरच त्याला अटक होण्याची शक्यता आहे.

सुरक्षा व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह

स्वारगेट बसस्थानक हे शहरातील सर्वाधिक वर्दळीचे आणि महत्त्वाचे वाहतूक केंद्र आहे. मात्र या घटनेमुळे बसस्थानकावरील सुरक्षेची गंभीर पातळी उघड झाली आहे.

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, स्थानक प्रमुख आणि आगारप्रमुख यांच्यावर चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी आढळल्यास तत्काळ निलंबन करण्याचे निर्देश

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *