बीड: जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात ठपका असलेला आणि खंडणी मागणीच्या गुन्ह्यातील आरोपी कराडने केज जिल्हा व सत्र न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. झोपेमध्ये श्वास घेताना त्रास होणाऱ्या स्लिप एपनिया आजाराचा दावा करत, त्याने सीआयडी कोठडीत 24 तास मदतनीस देण्याची मागणी केली होती. मात्र, कराडला न्यायालयाने दणका देत ही मागणी फेटाळली आहे.
कोठडीत मदतनीस ठेवण्याची मागणी फेटाळली
आरोपी वाल्मिक कराडला खाजगी व्यक्तीकडून ऑटोकॅप मशीन चालवण्यासाठी मदतनीस पुरवण्याची विनंती केली होती. मात्र, न्यायालयाने असा मदतनीस कोठडीत ठेवता येणार नाही, असे स्पष्ट करत याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने सीआयडीला शासकीय वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत.
स्लिप एपनिया आजार नेमका काय आहे?
हा स्लिप एपनिया झोपेसंबंधी गंभीर आजार आहे. यामुळे झोपेच्या दरम्यान व्यक्तीचा श्वास वारंवार थांबतो. या स्थितीमुळे थकवा, लक्ष केंद्रित करण्यात अडचण, आणि गंभीर वैद्यकीय समस्या होऊ शकतात.
या आजाराचा धोका कोणाला जास्त?
• जास्त वजन असलेल्या व्यक्तींना
• जोरात घोरणाऱ्या लोकांना
• अनुवांशिकतेने हा आजार कुटुंबात येण्याची शक्यता
• वयस्कर लोकांमध्ये याचा अधिक धोका
कराडकडून न्यायालयाला करण्यात आलेल्या विनंतीनंतरही न्यायालयाने आरोपीला फक्त शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.